-
शाळेचे नाव : श्री गाडगे महाराज इंग्लिश मेडियम विद्यामंदिर ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे– ४१२ ४०९
-
शाळेची स्थापना : जून २००९
-
वर्ग : इयत्ता १ ली ते १० वी
-
एकूण वर्ग संख्या : १३
-
शाळेचा युडायस नंबर : २७२५०७०६८२१
-
शाळेचा इमेल : sgmeotur@gmail.com
-
शाळेची एकूण क्षेत्रफळ : २.६० आर
-
मुख्याध्यापक : १
-
शिक्षक : १०
-
शिक्षकेतर कर्मचारी : १
-
वर्ग खोल्या : शाळेतील वर्ग खोल्या ह्या प्रशस्त आहेत. वर्ग खोल्या हवेशीर असून वातावरण प्रसन्न व आनंददायी आहे. वर्गात हवा खेळती राहण्यासाठी समोरासमोर खिडक्या आहेत. पुरेसा सूर्यप्रकाश येण्यासाठी सुयोग्य व्यवस्था केलेली आहे.विद्यार्थी आवडीने दिवसभर अध्ययन करतात. विद्यार्थी आनंदाने शाळेत येतात. वर्ग खोल्यांत आकर्षक सजावट केल्याने वर्ग अधिक आकर्षक वाटतात.
-
ई – लर्निंग : आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही स्पर्धेच्या युगात मागे राहू नयेत म्हणून विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना अनेक सुविधांचा लाभ मिळत आहे. अनेक शिक्षक ई लर्निंगचे प्रशिक्षण घेतलेले असून विद्यार्थांना त्याचा पुरेपूर वापर करून देतात.
-
संगणक कक्ष : संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे म्हणून विद्यालयात स्वतंत्र संगणक कक्ष आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य विभाग असून त्या ठिकाणी फिल्म प्रोजेक्टरची सोय आहे. विद्यार्थ्यांना माहिती पट तसेच वैज्ञानिक ऐतिहासिक फिल्म या ठिकाणी दाखवल्या जातात.
-
विज्ञान प्रयोगशाळा : विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी विद्यालयात प्रशस्त व भव्य विज्ञान प्रयोगशाळा आहे. प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. विद्यालयातील अनेक विद्यार्थी दरवर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन क्रमांक प्राप्त करीत आहेत. विद्यार्थांचा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करण्याचे कार्य विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
-
वाचनालय : “वाचाल तर वाचाल” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त केले जाते. विद्यालयात नियमितपणे वृतपत्रे उपलब्ध करून दिली जातात .
-
ग्रंथालय : विद्यार्थांच्या ज्ञान कक्षा विस्तृत करण्यासाठी त्यांना पुस्तकांच्या विश्वात घेऊन जाण्यासाठी विद्यालयात स्वतंत्र ग्रंथालय असून त्यामध्ये विविध विषयांवर आधारित हजारो पुस्तके आहेत. यात कथा, काव्य, कादंबऱ्या,खंड काव्य, पुराणग्रंथ, विज्ञान ग्रंथ, भाषेचे शब्दकोश, बाल साहित्य, गोष्टींची पुस्तके उपलब्ध आहेत.
-
क्रीडा विभाग : शरीर, मन आणि बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण. म्हणून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासही साधला जावा यासाठी विद्यालयात खेळासाठी प्रशस्त मैदान देखील आहेत. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. शाळेमध्ये स्वतंत्र क्रीडा साहित्यासाठी खोली असून त्यामध्ये विविध प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले असून त्याचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. शाळेला भव्य क्रीडांगण असल्याने दररोज विद्यार्थी या क्रीडांगणावर विविध खेळ खेळतात. विद्यार्थ्यांकडून योगासने, व्यायाम करून घेतला जातो. दरवर्षी शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे शाळेत आयोजन केले जाते. विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यानी यश संपादन केलेले आहे.
-
आरोग्य : “आरोग्यम धन संपदा” हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना नेहमी दिला जातो. यासाठी विद्यालयात रोज सकाळी प्रार्थनेच्या नंतर व्यायामाचे प्रकार व योगा विद्यार्थ्यांना शिकवला जातो. स्वच्छता या विषयावर अनेक व्याख्याने आयोजित केली जातात. गाडगेबाबांनी गावे साफ करून नंतर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मने साफ केली. हे बाबांचे कार्य विद्यार्थ्यांना ज्ञात असल्यामुळे विद्यार्थी स्वत:चे आरोग्य देखील सांभाळतात. योग्य आहार व स्वच्छ जल याचे महत्व देखील समजावून विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांच्या आहारातील पोषक घटकांच्या समावेशासाठी विशेष नियोजन शाळेकडून केले जाते.
-
सहशालेय उपक्रम : विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न व्हावा यासाठी विद्यालयात नियमितपणे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, राखी बनविणे, गणपती बनविणे, आकाश कंदील, पणत्या बनविणे वस्तू निर्मिती करणे अशा विविध स्पर्धा प्रसंगानुसार आयोजित केल्या जातात. विविध महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी साजऱ्या करून विद्यार्थ्यांच्या मनात महापुरुषांचे विचार बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.
-
गुणवत्ता : विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी गुणवत्ता पूरक शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. उदाहरणार्थ वाचन लेखन प्रकल्प, जड तास, शिष्यवृत्ती परीक्षेत बसवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन, तज्ञ मार्गदर्शक शिक्षक व्याख्यान,अक्षर सुधार प्रकल्प, मासिक चाचण्या, सत्र परीक्षा यांचे यशस्वी आयोजन केले जाते. शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चांगले गुण प्राप्त केलेले आहे. तसेच IMO Exam , Chintan Exam, NSSC Exam अशा वेगवेगळ्या परीक्षा दरवर्षी घेण्यात येतात.
-
शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था : विद्यार्थ्यांना बारमाही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासाठी शाळेत फिल्टर बसविण्यात आले आहे.
-
नियमित फलक लेखन : विद्यालयात प्रत्येक वर्गखोली जवळ एक फळा आहे. त्यावर प्रेरक सुविचार किवा विषयानुरूप चित्र काढले जातात. प्रत्येक सणानुसार किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार शाळेत Art And Craft चे बोर्ड तयार केले जातात. शाळेच्या भिंतींवर बोलकी चित्रे काढलेली आहेत.
-
शालेय परिपाठ : विद्यालयात नियमितपणे प्रार्थना व शालेय परिपाठ घेतला जातो. यामध्ये दैनंदिन ठळक बातम्या, सुविचार, बोधकथा प्रत्येक इयत्तेनुसार सांगितले जाते. परिपाठात नाविन्य असते. प्रत्येक दिवशी नवीन प्रार्थना मुली म्हणतात. परिपाठात ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस असतील त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. परिपाठ म्हणजे खऱ्या अर्थाने शालेय दिवसाची सुंदर सुरुवात असते. प्रार्थनेने मन शुद्ध होते.
-
क्षेत्रभेटी : क्षेत्रभेटीव्दारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण दिल्याचा आनंद देता येतो. यासाठी अनेक वेळा क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ शिवनेरी किल्ला, भंडारदरा, शिर्डी, साखर कारखाना, खोडद येथील जीएमआरटी, वृद्धाश्रम, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस सारख्या अनेक ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक ठिकाणी भेटी दिल्या जातात.
-
चित्रकला प्रदर्शन : वर्षभर विविध दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आपल्या कल्पकतेचा वापर करून सुंदर चित्र काढतात. या चित्रांचे प्रदर्शन दरवर्षी गणपतीमध्ये केले जातात.
-
सांस्कृतिक कार्यक्रम : प्रत्येक वर्षी 20 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असते. याचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न केले जातात. तीन दिवस हा उत्सव शिक्षण संकुलात मोठ्या दिमाखात चालतो. 23 डिसेंबर रोजी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. यामध्ये विद्यार्थी आपले कलागुण दाखवून कार्यक्रमात रंगत आणतात.
कार्यरत मुख्याध्यापक :
- सौ.स्वाती कल्याण सोनावणे
- एम.ए.बी.एड.
- संपर्क :९७ ३० १७ ४२ ६२