Shape

श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई

श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई हि सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचा कार्य विस्तार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत झालेला आहे. संस्थेचे कार्य मोठे असून या संस्थेने सन 2022 साली आपल्या कार्याची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात संस्थेने आपल्या कार्य विकासासाठी भक्कम अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे.

संस्थेची स्थापना :

संतश्रेष्ठ गाडगे बाबांनी सन १९५२ मध्ये श्री गाडगे महाराज मिशनची स्थापना केली. श्री गाडगे बाबांचे मिशन स्थापन करण्यापाठीमागे अनेक हेतू होते. गाडगे बाबांनी गृहत्यागानंतर ( इ.स.१९०५ ) समाजसेवा कार्याला सुरुवात केली. इ.स. १९०८ मध्ये सहकारी मंडळींच्या मदतीने अमरावती जिल्ह्यात पूर्णा नदीकाठी प्रथम घाट बांधला. हि त्यांच्या रचनात्मक सामाजिक कार्याची सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी गरजेनुसार धर्मशाळा स्थापन केल्या. अंध-पंगु रोग्यांसाठी सदावर्ते सुरु केली, वृद्धाश्रम सुरु केले, मुक्या जनावरांसाठी गोरक्षण संस्था चालू केल्या. त्यांनी अशा प्रकारच्या अनेक संस्था, शाखा-उपशाखा महाराष्ट्रभर सुरु केल्या होत्या. ह्या सर्व संस्था, शाखा-उपशाखांचा कारभार आपल्या पश्चात व्यवस्थित चालावा, सर्व संस्थांच्या कारभाराचे एक मुख्य ठिकाण असावे, सर्व शाखांना संस्थात्मक स्वरूप यावे, अशा अनेक उदात्त हेतूने मिशनची मुंबई या ठिकाणी स्थापना केली. मिशनच्या स्थापनेमुळे संस्थेच्या कार्यास गती मिळाली. संस्थेचा विस्तार वाढू लागला. असे असताना त्यासाठी कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज जाणवू लागली. हि गरज लक्षात घेऊन श्री गाडगे बाबांनी उच्चशिक्षित व्यक्ती आणि सहकारी मंडळी यांच्या बरोबर चर्चा करून स्वत: मिशनच्या प्रशासनाचा आराखडा तयार केला. प्रशासनामध्ये विश्वासू व्यक्तींचा समावेश करून त्यांच्याकडे कारभाराची जबाबदारी सोपवली. स्वत: मात्र मिशनमध्ये कोणतेही अधिकाराचे पद स्वीकारले नाही.

इ.स.१९५२ ते इ.स.१९७२ चे व्यवस्थापन मंडळ :

अध्यक्ष : श्री. अच्युतराव गुलाबराव देशमुख
उपाध्यक्ष : १) श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकरंबाळकर
२) श्री. रा. ब. जयंतीलाल मानकर
खजिनदार : श्री. जे. व्ही. जोशी
जनरल सेक्रेटरी : श्री. यशवंत तुकाराम शिंदे
सभासद : १) श्री. जी. डी. तपासे
२) श्री. पी. ए. म्हात्रे
३) श्री. एस. डी. जाधव
४) शेठ दुर्गा पांडुरंग दुर्गय्या
५) ह. भ. प. कैकाडी महाराज
६) श्री. विश्वनाथ वाघ
७) श्री. बबन महाराज कळसकर
८) श्री. यशवंतराव माने
९) श्री. एस.बी. भोजने वकील
१०) श्री. प्रभाकर गणपतराव जाधव
११) श्री. गुणवंतराव बा. चराटे

इत्यादी व्यक्तींची श्री गाडगे बाबांनी मिशनच्या प्रशासनपदी नियुक्ती केली आणि मिशनचा कारभार या व्यक्तींकडे सोपवला. या व्यक्तींनी मिशनच्या प्रशासनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनचा कार्यविस्तार केला.

सुरुवातीच्या कालखंडात मिशनच्या पदाधिका-यांच्या कार्यक्षम प्रशासनामुळे इ.स.१९७२ पर्यंत मिशन संचलित शाखांची संख्या सुमारे ३७ पर्यंत पोहचली. मिशन संचलित शाखांच्या वाढत्या संख्येमुळे मिशन प्रशासनात कालानुरूप बदल करणे गरजेचे वाटू लागले. हे बदल करण्यासाठी मिशनच्या तत्कालीन नेतृत्वाने ( प्रशासनाने ) श्री गाडगे महाराज मिशनची घटना दुरुस्ती करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यानुसार सन १९७१ मध्ये घटना दुरुस्तीचा ठराव संमत करण्यात आला. ह्या ठरावानंतर दिनांक १ जून १९७१ रोजी मिशनच्या मुल घटनेत दुरुस्ती केली आणि ह्या घटना दुरुस्तीनुसार मिशनचा कारभार चालविला जाईल असे ठरविण्यात आले. घटना दुरुस्तीमध्ये मिशनच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी खालील घटकांचा समावेश केला गेला.

  1. सर्वसाधारण समिती
  2. केंद्रीय कार्यकारी मंडळ
  3. विश्वस्त मंडळ
  4. आश्रयदाता
  5. हितचिंतक
  6. आजीवसेवक, प्रचारक व सेवक

मिशनच्या सन १९७१ च्या घटना दुरुस्तीनुसार वरील बाबींचा मिशनच्या प्रशासन व्यवस्थेत समावेश करण्यात येऊन त्यांची निवडपद्धती, कार्ये व त्यांच्यासाठी नियम ठरवून दिले आणि प्रशासनाचा नवीन आकृतिबंध तयार झाला. या घटना दुरुस्तीनुसार जर मिशनचा कारभार चालत नसेल अथवा त्यामध्ये गोंधळ निर्माण होऊन श्री गाडगे महाराज मिशनचे विसर्जन झाल्यास काय केले जाईल याचीही नोंद मिशनच्या घटना दुरुस्तीमध्ये केली आहे.

श्री गाडगे महाराज मिशन हि सेवाभावी संस्था आहे. या संस्थेने आपल्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर केलेला आहे. त्यामुळे मिशन संचलित अनेक शाखा-उपशाखा राज्यभर कार्यरत आहेत. त्यामध्ये धर्मशाळा, आश्रमशाळा, विद्यालये, वृद्धाश्रम, वसतिगृहे, अनाथ बालकाश्रम, पाळणाघरे, वाचनालये, ज्युनिअर कॉलेज इत्यादींचा समावेश आहे. यांचा कारभार सुरळीत चालावा म्हणून दिनांक ९/०४/२०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुढील सदस्यांची पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली.

पदाधिकारी ( सन २०२१ ते २०२४ साठी ):

अध्यक्ष : मा.ना.अड. श्रीमती यशोमती चंद्रकांत ठाकूर, अमरावती
कार्याध्यक्ष / चेअरमन : श्री. मधुसूदन पंढरीनाथ मोहिते, ब्रम्हपुरी, सातारा
उपाध्यक्ष : श्री. उत्तमराव अच्युतराव देशमुख, मुर्तीजापुर, अकोला
सचिव : श्री विश्वनाथ बापूराव नाचवणे, चालतवड, जव्हार
सचिव : श्री. सचिन राजाराम घोंगटे, उमरी, यवतमाळ
खजिनदार : श्री. ज्ञानदेव वासुदेव महाकाळ, धाकरमल, अमरावती
खजिनदार : श्री. अशोक वसंतराव पाटील, वळण, अहमदनगर

कार्यकारिणी मंडळ ( सन २०२१ ते २०२४ साठी )

  1. मा.ना.अॅड. श्रीमती यशोमती चंद्रकांत ठाकूर, अमरावती
  2. श्री. मधुसूदन पंढरीनाथ मोहिते, ब्रम्हपुरी, सातारा
  3. श्री. उत्तमराव अच्युतराव देशमुख, मुर्तीजापुर, अकोला
  4. श्री विश्वनाथ बापूराव नाचवणे, चालतवड, जव्हार
  5. श्री. सचिन राजाराम घोंगटे, उमरी, यवतमाळ
  6. श्री. ज्ञानदेव वासुदेव महाकाळ, धाकरमल, अमरावती
  7. श्री. अशोक वसंतराव पाटील, वळण, अहमदनगर
  8. श्री. अश्विनभाई मफतलाल मेहता, मुंबई
  9. श्री. मारोती बापूराव शिंदे, ताथवडा, फलटण
  10. श्री. चंद्रकांत यशवंतराव माने, मुरूम सर्कल, फलटण
  11. श्री. अनिल संताजीराव आवटे, भिवाळी, ठाणे
  12. श्री. सुनिल नारायणराव बायस्कर, बेरवळ, नाशिक
  13. श्रीमती. चंद्रकला दिलीप पाचंगे, पंढरपूर

संस्थेचा शैक्षणिक / सामाजिक कार्याचा विस्तार

जिल्हानिहाय गोषवारा

जिल्हा - सातारा

विभाग : इतर मागास बहुजन कल्याण विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. ब्रम्हपुरी, पो. धामनेर, ता. कोरेगाव, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु.पो. गोंदवले बु., ता. माण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु.पो. ताथवडा, ता. फलटण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. मुरूम सर्कल, ता. फलटण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. येळेवाडी, पो. बिजवडी, ता. माण, जि. सातारा

विभाग : इतर मागास बहुजन कल्याण विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. ब्रम्हपुरी, पो. धामनेर, ता. कोरेगाव, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु.पो. गोंदवले बु., ता. माण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु.पो. ताथवडा, ता. फलटण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. पो. मुरूम सर्कल, ता. फलटण, जि. सातारा

विभाग: शालेय शिक्षण विभाग

उपक्रम: माध्यमिक विद्यालये

शाखा :

  • श्री बिरोबा विद्यालय, मु.पो. पांगरी, ता. माण, जि. सातारा
  • श्री भैरवनाथ विद्यालय, मु.पो.तोंडले, ता. माण, जि. सातारा
  • श्री हनुमान विद्यालय, मु.पो. इंजबाब, ता. माण, जि. सातारा

विभाग: सामाजिक न्याय विभाग

उपक्रम: मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहे ( मुलांचे )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु.पो. गोंदवले बु., ता. माण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु. ब्रम्हपुरी, पो. धामनेर, ता. कोरेगाव, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु.पो. ताथवडा, ता. फलटण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु. पो. मुरूम सर्कल, ता. फलटण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु.पो. पांगरी, ता. माण, जि. सातारा

विभाग: सामाजिक न्याय विभाग

उपक्रम: मागासवर्गीय विद्यार्थिनी वसतिगृह ( मुलींचे )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कन्या छात्रालय, मु.पो. गोंदवले बु., ता. माण, जि. सातारा

विभाग: महिला व बाल विकास विभाग

Activities: निराधार बालकाश्रम

शाखा :

  • श्री गाडगे महाराज निराधार बालकाश्रम, मु.पो. गोंदवले बु., ता. माण, जि. सातारा

विभाग: महिला व बाल विकास विभाग

उपक्रम: बालगृह

शाखा :

  • श्री गाडगे महाराज बालगृह ( मुलांचे ), मु. येळेवाडी, पो. बिजवडी, ता. माण, जि. सातारा
  • श्री गाडगे महाराज बालगृह ( मुलींचे ), मु. येळेवाडी, पो. बिजवडी, ता. माण, जि. सातारा

विभाग: केंद्रशासन

उपक्रम: मागासवर्गीय केंद्रीय विद्यालय

शाखा :

  • मागासवर्गीय केंद्रीय विद्यालय, मु.पो. बिजवडी, ता. माण, जि. सातारा

जिल्हा : सांगली

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम :मागासवर्गीय विद्यार्थिनी वसतिगृह

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कन्या छात्रालय, मंगळवार पेठ, मु.पो.ता. मिरज, जि. सांगली

जिल्हा : सोलापूर

विभाग : शालेय शिक्षण विभाग

उपक्रम : माध्यमिक विद्यालय

शाखा :

  • मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला, मु.पो.ता. पंढरपूर, जि. सोलापूर

जिल्हा : पुणे

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे

विभाग: शालेय शिक्षण विभाग

उपक्रम: माध्यमिक विद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यालय, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे

विभाग: सामाजिक न्याय विभाग

उपक्रम: मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह

शाखा :

  • श्री गाडगे महाराज आदिवासी विद्यार्थी वसतिगृह, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे
  • श्री गाडगे महाराज जनता विकास वसतिगृह, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे
  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु.पो. ता. जुन्नर, जि. पुणे

विभाग: सामाजिक न्याय विभाग

उपक्रम:मागासवर्गीय विद्यार्थिनी वसतिगृह

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कन्या छात्रालय, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे

विभाग: महिला व बालविकास विभाग

उपक्रम: निराधार बालकाश्रम

शाखा :

  • श्री गाडगे महाराज निराधार बालकाश्रम, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे

विभाग: शालेय शिक्षण विभाग

उपक्रम: इंग्लिश मेडियम शाळा ( स्वयंम अर्थसहाय्यीत )

शाखा :

  • सेंट डेबुज स्मार्ट स्कूल, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे

जिल्हा : मुंबई

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम :मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह ( मुलांसाठी )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, न्यू मिल रोड, कुर्ला ( प ), मुंबई – ७०

विभाग : शालेय शिक्षण विभाग

उपक्रम : माध्यमिक विद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यालय, न्यू मिल रोड, कुर्ला ( प ), मुंबई – ७०

विभाग: सामाजिक कार्य

उपक्रम: धर्मशाळा

शाखा :

  • श्री मफतलाल मोहनलाल मेहता धर्मशाळा, मुंबई
  • श्री गाडगे महाराज धर्मशाळा, शारदा सदन, सेक्टर नंबर २०, खारघर, नवी मुंबई

जिल्हा : ठाणे

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. भिवाळी, पो. गणेशपुरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. भातसई, पो. वेहलोळी, ता. शहापूर, जि. ठाणे

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. भिवाळी, पो. गणेशपुरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. भातसई, पो. वेहलोळी, ता. शहापूर, जि. ठाणे

जिल्हा : पालघर

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. चालतवड, पो. साखरशेत, ता. जव्हार, जि. पालघर
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. दाभोण, पो. ऐना, ता. डहाणू, जि. पालघर

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. चालतवड, पो. साखरशेत, ता. जव्हार, जि. पालघर
  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. दाभोण, पो. ऐना, ता. डहाणू, जि. पालघर

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : कनिष्ठ महाविद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय, मु. चालतवड, पो. साखरशेत, ता. जव्हार, जि. पालघर

जिल्हा : अहमदनगर

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. ता. राहुरी, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. पो. ता. राहुरी, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. पो. वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर

विभाग : इतर मागास बहुजन कल्याण विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. वरवंडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. टाकळी काझी, ता. जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. मिरपूर लोहारे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर

विभाग : इतर मागास बहुजन कल्याण विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. पो. वरवंडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर

विभाग : शालेय शिक्षण विभाग

उपक्रम : माध्यमिक विद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यालय, मु. पो. मिरपूर लोहारे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम : मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह ( मुलांसाठी )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु. पो. ता. राहुरी, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु. पो. भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु. पो. टाकळी काझी, ता. जि. अहमदनगर

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम : मागासवर्गीय विद्यार्थिनी वसतीगृह ( मुलींसाठी )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यार्थीनी वसतिगृह, मु. पो. ता. राहुरी, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज विद्यार्थीनी वसतिगृह, मु. पो. भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर

विभाग :महिला व बाल विकास विभाग

उपक्रम :निराधार बालकाश्रम

शाखा :

  • श्री गाडगे महाराज निराधार बालकाश्रम, मु. पो. ता. राहुरी, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज निराधार बालकाश्रम, मु. पो. भानसहिवरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर
  • श्री गाडगे महाराज निराधार बालकाश्रम, मु. पो. सावेडी, ता. जि. अहमदनगर

जिल्हा : नाशिक

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. बेरवळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु.पो. बेलवड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. बेरवळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु.पो. बेलवड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : कनिष्ठ महाविद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय, मु.पो. बेलवड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

जिल्हा : जळगाव

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम : मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह ( मुलांसाठी )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, गडकरी नगर, मु.पो.ता. भुसावळ, जि. जळगाव

जिल्हा : औरंगाबाद

विभाग : सामाजिक कार्य

उपक्रम : धर्मशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज घाटी धर्मशाळा, पाणचक्की रोड, औरंगाबाद – ४३१ ००१

जिल्हा : बीड

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम : मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह ( मुलांसाठी )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु. पो. चौसाळा, ता. जि. बीड

जिल्हा : नांदेड

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. सिताखंडी, पो. वाकद, ता. भोकर, जि. नांदेड

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. सिताखंडी, पो. वाकद, ता. भोकर, जि. नांदेड

जिल्हा : अमरावती

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. नागरवाडी, पो. वणी, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु.पो. ढाकरमल, ता. धारणी, जि. अमरावती

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. नागरवाडी, पो. वणी, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती
  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु.पो. ढाकरमल, ता. धारणी, जि. अमरावती

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : कनिष्ठ महाविद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय, मु.पो. ढाकरमल, ता. धारणी, जि. अमरावती

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम :मागासवर्गीय विद्यार्थीनी वसतीगृह ( मुलींसाठी )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कन्या छात्रालय, मु. पो. ता. दर्यापूर, जि. अमरावती

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम : वृद्धाश्रम

शाखा :

  • श्री गाडगे महाराज वृद्धाश्रम, मु.पो. वलगाव, जि. अमरावती

विभाग : महिला व बाल विकास विभाग

उपक्रम : निराधार बालकाश्रम

शाखा :

  • श्री गाडगे महाराज निराधार बालकाश्रम, मु. पो. बनोसा, ता. दर्यापूर, जि. अमरावती

जिल्हा : यवतमाळ

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. पो. उमरी, ता. केळापूर, जि. यवतमाळ
  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु.पो. आकोली, ता. केळापूर, जि. यवतमाळ

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : माध्यमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु. पो. उमरी, ता. केळापूर, जि. यवतमाळ
  • श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, मु.पो. आकोली, ता. केळापूर, जि. यवतमाळ

विभाग : आदिवासी विकास विभाग

उपक्रम : कनिष्ठ महाविद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय, मु. पो. उमरी, ता. केळापूर, जि. यवतमाळ

जिल्हा : बुलडाणा

विभाग : शालेय शिक्षण विभाग

उपक्रम : माध्यमिक विद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यालय, मु. पो. दहिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

विभाग : शालेय शिक्षण विभाग

उपक्रम : कनिष्ठ महाविद्यालय

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय, मु. पो. दहिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम : मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह ( मुलांसाठी )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज विद्यार्थी वसतिगृह, मु. पो. दहिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम :मागासवर्गीय विद्यार्थीनी वसतीगृह ( मुलींसाठी )

शाखा :

  • श्री गाडगे महाराज कन्या छात्रालय, मु. पो. दहिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

जिल्हा : वर्धा

विभाग : इतर मागास बहुजन कल्याण विभाग

उपक्रम : प्राथमिक आश्रमशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रमशाळा, मु. जुनगड, पो. केळझर, ता. सेलू, जि. वर्धा

जिल्हा : चंद्रपूर

विभाग : सामाजिक न्याय विभाग

उपक्रम : धर्मशाळा

शाखा :

  • श्री गाडगे महाराज धर्मशाळा, मु. पो. ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर

श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई

प्रशासकीय कार्यालय पत्ता

९०९, हावरे इन्फोटेक पार्क, सेक्टर नंबर ३० अ, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३